Medha Joshi

Medha Joshi

दीपाने नेहमी प्रमाणे तिच्या कार्यक्रमाचे आमंत्रण फोन व पोस्ट टाकून केलेले होतेच अर्थात निंमत्रणानंतरच जायचे इतके आमचे नाते औपचारिक नाहीच. हा उपचार फक्त स्थळ व वेळ व दिनांक कळावा एवढ्या करताच ... त्या दिवशी " मिळून सार्याजणी " च्या सखी मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास जाण्याची तयारी अतिशय उत्साहाने केली. कारण दिपाला टापटीप राहणे, राहायला भाग पाडणे  फार आवडते व ती समोरच्याचे मनापासून कौतुक करते . तसे ते तिने मला बघताच केलेही.
मी अगदी वेळेवर पोहचले सभागृहात ... समोर नेहमीचीच शांत ,संयमित , दिपा समोर दिसताच कार्यक्रम मस्तच होणार ही खूणगाठ मी मनाशी बांधली याला कारण पूर्वानुभव ! 
प्रास्तविक झाल्यावर  "तिचा लेखन प्रवास " या विषयाला तिने लिलया सुरवात केली . तिचे एक वैशिष्ट्य मला नमुद करावेसे वाटते ते की , क्षेत्र कोणतेही असो ती मुलाखतकार असो , वक्ता असो किंवा लेखिका असो तिचा त्या त्या परिघातला वावर सहजगत्या असतो. तसाच आज जाणवला तिचे किस्से , उदाहरण , अनुभव अनेकदा ऐकूनही नवेच का वाटतात हे मला न उलगडणार कोड आहे.  भाषेवरच प्रभुत्व इतके की विज्ञान , गणिता सारखे क्लिष्ट विषयही रंजक पध्दतीने सांगण्याची तिची हातोटी दिपाचा त्या विषयाचा सखोल अभ्यास व तिने घेतलेली अफाट मेहनत दर्शवितो. दिड तास पाण्याचा घोटही न घेता अखंड बोलणारी तू कुणासही कंटाळवाणी वाटली नाहीस उलट हा झरा असाच खळखळत रहावा ही तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मैत्रीणीने बोलून दाखवलेली इच्छा ...! तू प्रत्येक भेटीत मला नव्याने उलगडत जातेस .. इतके लिखाण असूनही अभिनीवेष आवेश तुला स्पर्श करत नाहीत सुरवात व शेवटाला कोणत्याच चौकटीत न बसवता पुढच्या भागाची उत्कटता तशीच ठेवत तू कार्यक्रम आटोपता घेतलास 
नंरच वातावरण खूपच अनौपचारिक होतं.. परस्परांशी ओळख , संवाद फोटोसेशन ....लाजबाब एक सोनरी सांयकाळ पर्समधे घेउन परतीचा मार्ग ..धरला....मेधा जोशी.