आसावरी कुलकर्णी 

आसावरी कुलकर्णी 

पूर्वसंध्या प्रिय सखीच्या वाढदिवसाची! प्रिय दीपा, आजची संध्याकाळ खरंच खूप स्पेशल होती.
अपूर्व आणि आलापला गप्पा मारताना मुंबईच्या आठवणीमध्ये रमलेलं बघून छान वाटलं.
आपल्याला तर कायमच कितीही वेळ एकत्र घालवायला मिळाला तरी कमीच वाटतो.
आज पन्नास 'पाथफाईंडर्स' कायमचे माझ्या संग्रही आले, ते ही तुझ्या लफ्फेदार स्वाक्षरीसह! म्हणजे तुझ्या वाढदिवसाची चिरस्मरणीय भेट मलाच मिळाली... 
आणि 'संदीप'मधलं जेवण तर काय, एकदम फर्मासच होतं. Dry Fruit मस्तानी was The Cherry on the Top!  
असंच आनंदाचं वाण कायम सगळ्यांना देत रहा.
तुझ्या नवनवीन अन आगळ्यावेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांच्या प्रतींची आम्हा वाचकांच्या संग्रहात भर पडत राहो आणि आमची वाचनसंस्कृती अशीच समृद्ध होत राहो!
तुझ्या सगळ्या इच्छा मनासारख्या पूर्ण होवोत, हीच हार्दिक शुभेच्छा   
Haapy Birthday दीपा  
आसावरी कुलकर्णी 

 

पूर्वसंध्या प्रिय सखीच्या वाढदिवसाची!