गीता भावसार

गीता भावसार

जगभरात जेव्हा जेव्हा क्रांती झाली... तेव्हा तेव्हा त्यात लेखणीचा मोठा वाटा होता. किंबहुना त्यामुळे च क्रांतिकारक बदल घडून आले.
चांगल्या पुस्तकांनी माणसाला नेहमीच विचारांच्या नवनव्या परिमाणांची दालनं खुली केली.
मनुष्याला सुसंस्कृतपणाला एकेक पायरी चढायला मदत केली. मार्ग दाखवले.दिशा दिली. आणि अशा पुस्तकांना कुठल्याही भाषेचे,भौगोलिक सीमेचे बंधन न राहता ही पुस्तकं सर्वदूर गेली.  वेळ आणि काळाचे बंधन न राहता कायमस्वरूपी स्मरणात राहिली.
अशी पुस्तकं विषय निरनिराळे असतील तरी संपूर्ण जगावर परिणाम करती झाली.
तर अशा जग बदलणार्या ५० पुस्तकांची माहिती..ओळख  आपल्याला जग बदलणारे " ग्रंथ" या दीपा देशमुख लिखित पुस्तकरुपाने आपल्या भेटीला येत आहे.
अर्थ,विज्ञान, तर्क, धर्म, इतिहास, भूगोल... अशा जवळपास सगळ्या विषयांवरील पुस्तकांची ओळख आणि त्याचे जगावर झालेले परिणाम आपल्याला वाचायला मिळणार आहेत.अगदी 'भगवद्गीतेपासून' ते अलिकडच्या 'सेपिअन्स ' पर्यंतचे आपल्याला यात वाचायला मिळणार आहे.
या पुस्तकाच्या निमित्ताने झालेल्या चर्चानी खूप भरभरुन दिलं...बेट्टी फ्राइडनचा स्त्रियांना पूर्ण वेतन मिळण्यासाठीचा लढा,तथाकथित भांडवलदारांचा विरोध पत्करुन निसर्गाच्या समतोलासाठी प्रयत्न करणारी रँचेल कार्सन,१५ वर्षे सातत्याने डिक्शनरी लिहिणारा सँम्युअल....यांना आलेल्या अडचणी पाहिल्यावर आपल्या सांसारिक चिंता किती क्षुल्लक आहेत असं वाटायला लागलं.स्माँल इज ब्युटीफुल ,गन्स,जर्म्स....यांच्या चर्चांनी किती वेगळा विचार करायला शिकवलं.
खरंतर तसं इंग्रजी वाचन कमीच माझं.पण यानिमित्ताने इतकं वाचलं याचं मलाच आश्चर्य वाटतंय.
यातले काही विषय हाताळताना जर आपल्याला इतकं मिळतंय तर आर्याने वाचलं तळ? तिच्या वयाच्या मुलांना किती वेगळी dimensions सापडतील.😍
पुस्तकं तुम्हाला एकटं पडू देत नाहीत. याचा पुनःप्रत्यय या पुस्तकासोबतच्या प्रवासात आला. त्यामुळे हे पुस्तक हातात पडल्यावरचा माझा आनंद विशेष आहे.
उत्कृष्ट रंगसंगती आणि समर्पक चित्रांचं मुखपृष्ठ असलेल्या या पुस्तकात प्रत्येक मूळ पुस्तकाचं  चित्र तर आहेच पण मूळ लेखकाचं चित्रही पाहिल्यावर तो स्वतः च त्याच्या पुस्तकाविषयी सांगतो य असा भास होतो.
माझ्यासाठी या पुस्तकाविषयीची आणखी एक आनंदाची गोष्ट अशी की याचा जन्म मला फार जवळून पाहता आला.पुस्तकाचा जन्म हा बाळ जन्माला घालण्यासारखेच आहे.त्या विषयाचा रात्रंदिवस मागोवा घेऊन ...संपूर्ण झोकून देऊन करण्याची ही गोष्ट आहे.दीपाताईंमुळे पुस्तक निर्मितीची अवघड प्रक्रिया अनुभवता आली.यातल्या काही विषयांना हातभार लावता आला.कामाचा झपाटा म्हणजे काय असतो ते त्यांच्याकडून समजलं.एखादं काम टाइमलाईन ला पूर्ण
करणं ,लेखनाच्या बारिकसारिक व्याकरणाच्या चुका लक्षात आल्या.
एक विषय कागदावर यायला किती वाचावं लागतं...चिंतन...मनन...करावं लागतं..याची प्रचिती आली. यातल्या एखाद्या विषयावर तासनतास केलेल्या चर्चा खूप सम्रुद्ध करुन गेल्यात. खूप नवीन शिकायला मिळालं.त्यानिमित्ताने खूप नवीन वाचायला ही मिळालं.
 कुठलंही राखून न ठेवता ते इतरांना देत राहणं हा त्यांचा स्वभाव.....या माझ्या शिकण्याच्या प्रकियेतही  दीपाताईंनी माझ्यासाठी खास ओळी  त्यांच्या मनोगतात लिहिल्यात...त्या माझ्यासाठी खूप आनंद देणार्या आणि प्रेरणादायी आहेत.
Thanku Tai😍 मला या सगळ्याचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल.....
सगळ्या वयोगटांसाठी हे पुस्तक informative ठरणार आहे.मला वाटतं असं हे ज्ञानाची दारं आपल्यासमोर खुलं करणारं "ग्रंथ" जरुर जरूर वाचावं....
प्रकाशाच्या या सणाला आपल्या प्रियजनांना भेट देण्यासाठी याहून उत्तम काय असेल?
@ जग बदलणारे "ग्रंथ"
दीपा देशमुख
मनोविकास प्रकाशन#