डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ

डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ

दीपा, 
सखे,  कुठून आणतेस एवढी ऊर्जा  एवढी ताकद लेखणीमधे  , की रोजच्या दिवसांतील तुझ्या भेटीगाठी सुद्धा आमच्यासाठी अविस्मरणीय ठरतात ! 
एक लेख लिहायला मला एक महीना जातो आणि तू रोजच्या रोज तारखेच्या आधी तुझे ठरलेले लिखाण लिहून पुन्हा सगळ्या भेटीगाठीचा , कार्यक्रमांचा व्रुत्तांत लिहायला उत्साहात बसतेस !
 आणि शब्द पुन्हा तुझ्या 
समोर तेवढ्याच तत्परतेने हजर असतात ! 
किती सहज आणि ओघवत्या शब्दांत मांडतेस सगळे विषय  की ते अगदी कोणत्याही वाचकापर्यत सहजपणे
पोहचतात ! 
तुझ्या बुद्धिमत्तेला , तुझ्या प्रतिभेला आणि तुझ्यातील निखळ  मानुषतेला माझा सलाम ! 
माझ्या आयुष्यात  मला लाभलेल्या अमूल्य व्यक्ती मधे तू आहेस,  ज्यांच्या  शिवाय आयुष्य पूर्ण होवू शकत नाही . ही केवढी श्रीमंती आहे माझ्या साठी हे मी तुला शब्दांत सांगू शकत नाही ! दीपा, एखद्या चित्रपटाप्रमाणे संपूर्ण काळ डोळ्यासमोर उभा राहिला , तुझी वाट तू निवडलीस आणि त्याचा महामार्ग बनवलास ज्यावर कितीतरी आयुष्ये तुझी प्रेरणा घेऊन चालत आहेत , चालत राहतील !
तू एकटीने खंबीरपणे उभा राहुन असामान्य कर्तृत्व करून दाखवलेस !
पण तरीही पोस्ट वाचताना डोळ्याला धारा लागल्या आणि वाटले की मी का नव्हते तूझ्या सोबत तेव्हा ....!
डोळ्यासमोर फक्त तरुण तडफदार स्वाभिमानी तू , छोटा अपूर्व आणि seven hill चा flyover दिसत आहे !
I am proud of you !
अन्यायाविरुध्द लढणे आणि त्यासाठी सुखवस्तू आयुष्य सोडुन त्यां सगळ्याला नकार देऊन शून्यापासून सुरुवात करायला निघणे भल्याभल्यांना जमत नाही कितीही स्त्रीवादी असल्या बायका तरी !
क्रुतीतून फार कमी जनीं स्वतःचे विश्व स्वतः उभे करतात !
मला अभिमान वाटतो की माझी सख्खी मौत्रीण प्रसीध्द लेखिका दीपा देशमुख आहे, जीं सर्वात आधी अत्यंत नितळ निखळ अशी माणूसपण असलेली अन भीडस्त अशी व्यक्ती आहे , हाडाची कार्यकर्ती आहे पंरतु त्याच वेळेला स्वाभिमान दुखावला तर ती किती कणखर होवू शकते हें मी डोळ्याने पाहीले आहे !
सखी मैत्रिणीं , तूझ्या आत्ता पर्यंतच्या सगळ्यां प्रवासाला माझा सलाम !
तूला आणि अपूर्व ला खूप खूप प्रेम !
तुझीच
सुवर्णसंध्या