धनंजय सरदेशपांडे 

धनंजय सरदेशपांडे 

माझी एक मैत्रीण आहे, एक नंबर हावरट. पुस्तकं किती वाचावी. एका दिवसात तीन चार मोठी पुस्तकं वाचून टाकते. बरं हे समजलं त्यावर हावरटा सारखे लिहिते. लिखाण तर विचारूच नका. ही झोपते, जेवते की नाही कुणास ठाऊक. रोज रतीब लावल्या सारखं लिखाण चालूच. जेवते बरं कारण जिथं खाते त्यावर लिहिते. मित्र? पायलीचे पन्नास त्या शिवाय पन्नास पाथ फाईंडर लिहिणार आहे? कोणत्याही क्षेत्रात हिचे चांगले मित्र, मैत्रिणी आहेतच. हावरट एक नंबर. लिहिते, वाचते, खाते, पिते इथपर्यंत ठीक पण सिनेमा, नाटक , गाण्याचे कार्यक्रम हावरट पणे पाहते. अनेक गोष्टी हिला करायच्या असतात, शिकायच्या असतात, समजून घ्यायच्या असतात. आता काय लहान आहे का? वाढ दिवस आहे ना आज मग जरा हावरट पणा कमी करून प्रकृती कडे लक्ष दे. तुझी माझी मैत्री हावरट पणे अशीच बहरत राहो.दीपा, वाढ दिवसाच्या आरोग्यपूर्ण सदिच्छा.  
धनंजय सरदेशपांडे