डॉ.कृष्णा शशिकला सपाटे

डॉ.कृष्णा शशिकला सपाटे

जीने के लिये और क्या चाहीये!! वाचलेल्या पुस्तकाच्या लेखकाला भेटण्याचं कुतूहल नेहमीच मनात उड्या घेत असत, लेखनप्रवासाची वाटचाल त्यांच्याच तोंडून ऐकताना मनात कृतार्थतेचा भाव दाटून येतो. लेखनातून आणि वाचनातून जीवनाचा असीमांत आनंद शोधताना आलेले अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकताना एक न्यारीच लज्जत श्रोत्याला तृप्त करून जाते. सगळं ऐकून मन बहरलेलं असताना अशा व्यक्तीकडून अमूल्य अशी भेटवस्तू मिळाल्यावर मात्र हरखून जायला होत. असाच अनुभव आज घेतला निम्मित होत "प्रबोधन व्याख्यानमालेत" "जिनियस" व अनेक पुस्तकाच्या लेखिका "दीपा देशमुख" मॅडम यांच्या हस्ते "पुरुष उवाच" हा विविध लेखांनी नटलेला अंक भेट म्हणून मिळताना.

त्यांच्याबरोबर गप्पा मारताना त्यांची वाचनसंस्कृती बद्दलची तळमळ जाणवत होती, जसा त्यांच्याशी बोलत गेलो तस त्यांचं व्यक्तिमत्व मनात घर करून गेलं. त्यांचे अनुभव ऐकताना थक्क व्हायला होतं होत. लेखनप्रवासात त्यांनी घेतलेले अनुभव ऐकून ते कायमचे मनाच्या पानांवर कोरून ठेवावेत असेच होते, विशेष म्हणजे त्यांचा साधेपणा हृदयात रुतून बसलाय. त्यांच्याशी झालेली भेट ही माझ्या आयुष्यातील अनमोल आठवण असून ती मनविणेवर सतत झंकारत राहील. अशी माणसं आयुष्यात भेटत गेली तर "जिने के लिये और क्या चाहीये!!"...

धन्यवाद Deepa Deshmukh मॅडम