गीता भावसार

गीता भावसार

#कोजागिरी आणि सिंफनी# किती तरी दिवसांपासून "सिंफनी " चा कार्यक्रम कुठल्यातरी कारणास्तव राहून जात होता.आज तो योग आला.कोजागिरी आणि सिंफनी दुग्धशर्करा योग....
बाणेर पाषाण लिंक रोडवरच्या 'अथश्री 'मधे अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांचा सिंफनीचा उत्कृष्ट कार्यक्रम आज पाहता आला. या लेखक द्वयीचे "सिंफनी "अजून वाचायचे आहे.त्यामुळे सादरीकरणात नेमके काय असेल ,याची उत्सुकता होती. बरोबर ८ वाजता कार्यक्रम सुरु झाला. सरिताताईंनी पाहुण्यांचे स्वागत करुन ओळख करुन दिली.पाश्चात्य संगीताचा हिंदी चित्रपट स्रुष्टीवरचा परिणाम हळूहळू स्क्रीनवर उलगडत होता.आणि त्यामागची पार्श्वभूमी ,किस्से, गंमत दीपाताई आणि अच्युत सर सांगत होते. पाश्चात्य संगीताचा एक तुकडा आणि त्याचा प्रभाव असलेला हिंदी गाण्याचा तुकडा स्क्रीनवर दाखवला जात होता.हे सगळं amazing होतं.हे technical श्रेय अपूर्व देशमुख ला जाते. 
जसजसे एक एक गाणे समोर येत होते ..तशी कमाल वाटत होती,आश्चर्य वाटत होते. आणि मजाही.अशी एकूण ३६ गाणी सादर झाली.  म्हणजे १८ पाश्चात्य आणि १८ हिंदी अगदी टायटन च्या जुन्या म्युझिक सोबत अनेक पाश्चात्य प्रकार ऐकायला मिळाले.म्हणजे खूप जवळचं ,परिचयाचं हिंदी गाणं कुठल्यातरी लांबच्या पाश्चात्य संगीताशी इतकं साम्य राखून असेल....याची कमाल वाटते. मस्तपैकी मसाला दुधाचा आस्वाद घेत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
गाणी सुरु असताना शेजारी बसलेल्या लेकीला माझ्याकडून  जुन्या गाण्यांचे ज्ञान देणेही सुरु होते.स्क्रीनवर दिसणारा कोण कुणाचा आजोबा,बाबा,काका,...वगैरे.....
कार्यक्रम संपूच नये असं वाटत होतं.आज तर फक्त ३६ चं गाणी पाहिली,ऐकली,समजून घेतली.आता "सिंफनी" वाचण्याचे वेध लागलेत,या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की यात QR codes दिलेले आहेत ,जे स्कँन करुन आपल्याला त्यातली गाणी प्रत्यक्ष अनुभवता येतात. अशा १५० गाण्यांचा समावेश आहे.शेवट सायोनारा या गाण्याने झाला... पण खरंतर गाण्यांचा मनात दरवळ सुरु झाला होता.
 दीपाताई,अच्युत गोडबोले सर,अपूर्व,आसावरी ताई
आजची कोजागिरी कायम लक्षात राहिल.