अनुराग पुस्तकालय

अनुराग पुस्तकालय

मनोविकास प्रकाशन प्रकाशित आणि अच्युत गोडबोल, दीपा देशमुख लिखित जग बदलणारे जीनियस हि मालिका नुकतीच प्रकाशित झाली आहे. यातील पुस्तक रसिक वाचकांच्या हाती देताना मनोविकास परिवारातील अनेक वितरकांना मनापासून आनंद होत होता.  चांगली पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडणारे आंबेजोगाई येथील अनुराग पुस्तकालयचे अभिजित जोंधळे यांनी जीनियस या पुस्तकांची मोठ्याप्रमाणावर प्रकाशन पूर्व नोंदणी तर केलीच पण नोदणी केलेल्या पहिल्या तीन रसिकवाचकांना घेवून त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशनही केले. यांनी यांनी जीनियस या पुस्तकाला जी अभिनव पद्धतीने दाद दिली त्यासाठी मनोविकास प्रकाशन त्याचे मनापासून आभारी आहेत.