अनुष्का बिडवे

अनुष्का बिडवे

'कॅनव्हास' बद्दल.....मोनालिसा-लिओनार्डो डा व्हींची एवढंच गणित मला माहीत होतं!
त्यातल्या त्यात अजून काय, तर आपण जास्त काही हुशारी केली तर आजूबाजूचे 'पार पिकासो असल्यासारखी वागू नकोस!' असे उद्गार ऐकल्यावर तेव्हा ही नावे कानावर पडायची! 
उमेश कुलकर्णी सरांच्या एका फिल्म वर्कशॉपमध्ये ते म्हणाले होते की पेंटिंग्ज चा अभ्यास करणं हे क्रिएटिव्हीटी साठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खूप विविध प्रकारांचे पेंटिंग्ज बघा, त्याचा आनंद घ्या, त्यातील दडलेला अर्थ  शोधा...
सायकॉलॉजीच्या पुस्तकांमध्ये जसे लिहितात, की निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवा.  आपला अहंकार नाहीसा होईल आणि आपलं मन प्रफुल्लित होईल! या विश्वातील कितीतरी गोष्टी आपल्याहून भव्य आहेत ह्याची जाणीव होईल...तसेच  या पेंटिंग्सचं ही आहे.
 रेंब्रो, व्हॅन गॉग, पॉल गोगँ, लोत्रेक, हेन्री मूर, एल ग्रेको अशा खूप खूप ग्रेट कलकारांबद्दल दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले ह्यांच्या 'कॅनव्हास' या अप्रतिम अशा पुस्तकातून माझ्या भेटीला आले. हो हो...भेटीलाच! ही सर्व मंडळी जीवन रसाने परिपूर्ण  होती, की मी त्याच्यासमोर असून त्यांच्या या थोर कलाकृती पाहत आहे आणि अनुभवत आहे असच वाटत होतं!
पेंटिंग्ज बघून त्यांचा आस्वाद घेण्याकरता मला एक माध्यम हवं होतं. या पेंटिंग्जला "अप्रोच" कसा करावा? या प्रश्नाचे उत्तर मी बरेच दिवस शोधण्याचा प्रयत्न करीत होते. मग मला पप्पाने 'कॅनव्हास' रेकमेंड केलं. पुस्तक पाहून मला हे अजून एक 'इन्फॉर्मेटिव' टाईपचं पुस्तक असेल असं वाटलं. पण मग मी लिओनार्दो दा व्हिंची, पिकासो, अगुस्तुस रोदाँ बद्दल माहिती वाचत नव्हते.. त्यांची कला अनुभवत होते. मी त्यांच्यबरोबरच मोठी होत होते, त्यांची सुखं, दुःखं..सर्व काही जणू माझच झालं होतं! 
अजून एक गोष्ट अशी की या पुस्तकाने माझ्या मर्यादित मराठी शब्दकोशात खूप भर पाडली आहे! मराठी लिहिण्यासाठी व वाचण्यासाठी कॅनव्हासने मला नक्कीच प्रेरित केले आहे! 
पुस्तकाच्या शेवटाला आले...आणि बिब्लियोग्रफी वाचली...आणि मला या पुस्तक कसे अस्तित्व आले याचे रहस्यं उलगडले...एवढी सगळी पुस्तके..किती किती मोठी लिस्ट! किती कष्ट घेऊन दीपा ताई आणि अच्युत गोडबोले सरांनी हे पुस्तक लिहिलं असेल! आपल्याला या लिस्ट मधील दिलेली सर्व पुस्तके वाचावी लागली असती! ते काम किती सोपं केलं नाही? 
कॅनव्हास सारखी पुस्तके लिहिण्यासाठी खूप खूप धन्यवाद! फक्त पेंटिंग्ज बद्दलच माहिती न देता, भाषा, चिकाटी, परिश्रम, एकाग्रता, आयुष्यात कधीही हार मानू नये अशी शिकवण देण्यासाठी खूप धन्यवाद! 
'मराठी सुधारण्याची खूप गरज आहे बरं का!' हे असंख्यवेळा माझ्या कानावर पडलेलं वाक्य... मला उद्देशुंनच! खरं आहे ते..पण इंग्लिश मिडीयम मधे शिकत असल्यामुळे मराठीचं वाचन मर्यादित होतं...
आता मी भरपूर मराठी साहित्य वाचत आहे आणि मराठीमधे लेखन करीत आहे..तुम्ही तर बघतच आहात माझ्या या लेखनातून..आणि हे सर्व 'कॅनव्हास'नेच केले......