सचिन उषा विलास जोशी

सचिन उषा विलास जोशी

#पाथफाइंडर्स
तुम्ही एकतर रस्ता शोधा 
किंवा 
नवीन रस्ता बनवा..
मी दुसरा पर्याय निवडला.. या दुसऱ्या पर्यायाची छोटीसी कहानी प्रसिद्ध लेखिका #दीपा_देशमुख यांनी #पाथफाइंडर्स या त्यांच्या नवीन पुस्तकात मांडली आहे. 
महाराष्ट्रातील २५ वेगळ्या वाटेवरची वेगळी माणसं त्यांच्या संघर्षाची कहाणी म्हणजे "पाथफाइंडर्स" पुस्तक.
दीपाताई चे पुस्तक का वाचावे?
तर यात आमच्या 25 out of box thinking करणाऱ्यांची गोष्ट आहे म्हणून नव्हे.. तर दीपाताई यांच्या लेखणीतून तुम्ही सर्वजण out of box विचार करू शकतात याचा आत्मविश्वास देते.. नुसताच आत्मविश्वास नाही तर पुस्तक वाचताना वेगळा विचार कसा करावा याची प्रोसेस पण समजते. 
बुक गंगा डॉट कॉम वर हे पुस्तक उपलब्ध आहे. चला या दिवाळीत सर्वांना हे पुस्तक भेट देऊन स्वतः प्रेरणा घेऊ आणि दुसऱ्यांना त्यांचा पाथ फाइंड करायला मदत करू.
हे पुस्तकाचे दोन भाग आहेत. भाग १ आणि भाग २. दोन्ही भाग वाचण्यासारखे आहेत. भाग २ च्या पुस्तकाची प्रस्तावना अनिल अवचट यांनी केली आहे. तर भाग १ याची प्रस्तावना सुप्रसिद्ध अर्थतज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोले यांनी लिहिली आहे. ते म्हणतात, "हे पुस्तक वाचकाला स्वतःची वाट शोधायला मदत करणार आहे."
मला जास्त आनंद याचा आहे या पंचवीस जणांमध्ये आपल्या नाशिकचे विश्वासजी ठाकूर, सुनीलजी खांडबहाले, विनायकजी रानडे हे सुद्धा आहेत. 
दीपाताई मनापासून धन्यवाद. आम्ही काम करत असतो हे करतांना कौतुकाची जेव्हा पाठीवर थाप पडते तेव्हा अजून उंच उडी मारायला प्रेरणा मिळते आणि हीच थाप जेव्हा तुमच्यासारखा लेखिका तुमच्या शब्दातून मांडतात तेव्हा अजून उंच आकाशात भरारी घेण्याची ताकद निर्माण होते. 
आपला 
सचिन उषा विलास जोशी