अरविंद पाटकर

अरविंद पाटकर

वेबसाईट प्रदर्शित करण्याचा कार्यक्रम खरच छान झाला.
यानिमित्ताने तुमच्यातील लेखकापेक्षा
माणूसम्हणून तुम्ही किती मोठ्या आहात हे समजले.
विविध क्षेत्रातील दिग्गज जेव्हा तुमच्याबद्दल एका सुरात बोलत होते तेव्हा त्यात कृत्रिमता नव्हती.
तुमच्या बद्दल आपुलकी, जिव्हाळा, प्रेम आणि तुमच्यातील सह्रदयतेचा
अनुभव आल्याशिवाय ती सर्व मंडळी
आतून भरभरून बोलली नसती.
तुम्ही आयुष्यात खूप काही कमावले आहे. 
इतरांची रेषा पुसण्यापेक्षा स्वत:ची रेषा मोठी करू या, 
या तुमच्या विचारानेच तुमचे आणि इतरांचे आयुष्य तुम्ही आनंदी करू शकलात.
तुमच्या नव्या वाटचालीला खूप खूप सदिच्छा.
माणूस म्हणून तुम्ही खूप मोठ्या आहात आता लेखक म्हणून तुम्ही खूप
खूप मोठ्या व्हा हीच मनापासून सदिच्छा.
अरविंद पाटकर