मराठी पुस्तक प्रेमी.

मराठी पुस्तक प्रेमी.

जग बदलणारे ग्रंथ

या नावातच प्रस्तुत पुस्तक कोणत्या दर्जाचे आणि कोणत्या व्याप्तीचे असेल याचा अंदाज येतो.मानवी जीवन समृध्द करणाऱ्या पन्नास ग्रंथांचा या पुस्तकात आढावा घेतलेला आहे.

पुस्तक:जग बदलणारे ग्रंथ
लेखिका: दीपा देशमुख
पृष्ठ:४३२ (दोन स्तंभी लिखाण)
प्रकाशन: मनोविकास प्रकाशन
मूल्य:३९९/  सवलत मूल्य:३७०/
टपाल खर्च:४०/ एकूण:४१०/

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा ही विनंती.
या पुस्तकांची यादी जेंव्हा वाचतो तेंव्हा आपल्याला लक्ष्यात येते की खरोखर या ग्रंथाची ती किमया आहे ,ज्यांच्यामुळे जग बदलले.नावे वाचण्यापूर्वी असे वाटू शकते की,ग्रंथांमध्ये इतकी शक्ती असते का? पण जेंव्हा त्यांची यादी वाचायला सुरू करतो तेंव्हा कळते हे खरं आहे.या ग्रंथांनी जग बदलले आहे. जगात परिवर्तन केलं आहे.ती प्रचंड शक्ती यामध्ये आहे.

ही ग्रंथ धर्म,अर्थ,काम, विज्ञान, तत्वज्ञान,गणित, मानसशास्त्र, मानववंश आदी विषांवरील आहेत.

या पुस्तकात जी पन्नास ग्रंथ विचारात घेतली आहेत त्यात गीता तर असणारच! ती प्रस्तुत ग्रंथात क्रमांक एक वर आहे....काळानुरूप घेतलेले आहेत ना! त्यात कौटिल्याने लिहिलेले अर्थशास्त्र ही आहे आणि वात्स्यायनाने लिहिलेले कामसूत्र ही आहे.रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली गीतांजली आहे. महात्मा गांधी नी लिहिलेल्या माझे सत्याचे प्रयोग या ही पुस्तकाचा अंतर्भाव केला आहे...पन्नास पैकी ६ भारतीय ग्रंथ आहेत.उर्वरित ४४ ग्रंथ जगातील आहेत.

आपण कोणती पुस्तकं वाचायला हवीत? या प्रश्नांचे उत्तर या पुस्तकातून मिळते.पन्नास ग्रंथ, त्यांचा प्रभाव,त्यांचा जगावर परिणाम, त्यांच्यावर झालेलं भाष्य,अनुवाद ,उपलब्धता यांची सर्व माहिती लेखिकेने दिलेली आहे.एक मोठी यादी मिळते.वाचलेले पुस्तकं किती खास होती याचा विचार मनात येतो आणि राहिलेली पुस्तकं वाचण्याची इच्छा होते.

या पुस्तकामुळे या पन्नास ग्रंथांची नव्याने चर्चा होत आहे.यातील अनेक पुस्तकांना पुन्हा वाचले जात आहे.दीपा मेहता यांनी या पुस्तकातून वाचन संस्कृती ला एक मोठी गती दिली आहे असे वाटते.कारण अनेक मंडळी यातील पुस्तकं आम्हाला हवेत म्हणून सांगत आहेत.
 
 या पन्नास ग्रंथांपैकी अनेक ग्रंथ आपल्यापैकी काहींनी वाचली ही असतील..जसे की अर्थाच्या शोधात, सेपियन्स, सेकंड सेक्स आदी!

त्यात सुरुवातीला धार्मिक ग्रंथ दिलेले आहेत.भारताने जगाला जे अनमोल विचार दिले,तत्वज्ञान दिले त्यातील   गीता हा ग्रंथ या पुस्तकातील क्रमांक एक वर घेतलेला आहे.महात्मा गांधी पासून अल्बर्ट आईन्स्टाईन पर्यंत असे कितीतरी जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या महान लोकांचे जीवन गीता या ग्रंथाने प्रभावित केलं आहे...त्याचा उल्लेख भावून जातो.गीतेवरील अनेक पुस्तकांची यादी मिळते.

त्रिपिटक :"एक क्षण एक दिवस बदलून टाकतो.एक दिवस एक जीवन बदलतो आणि एक जीवन सारे जग बदलू शकते- भ.गौतम बुद्ध." हे विचार ज्या ग्रंथात समविष्ठ आहेत ते तीन ग्रंथ म्हणजे त्रिपिटक! यांचा जवळपास पूर्ण आशिया खंडात ग्रंथांचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार जीवन जगले जाते असे तीन बुद्ध धम्माचे ग्रंथ म्हणजे त्रीपिटक होत.या ग्रंथाची निर्मिती बुद्ध काळात झाली.आजही भारतासह पूर्ण आग्नेय आशियातील देश या तत्वज्ञानाचे अनुयायी आहेत.इराण,पर्शिया,अफगाणिस्थान आज यातून  बाहेर पडले आहेत.ते आता कुराण या धार्मिक ग्रंथांचे अनुयायी आहेत.

जगावर इंग्रजांनी राज्य केलं असे आपण म्हणतो.पण जगावर राज्य ग्रंथांनी केलं केलं आहे...असे मी म्हणेल.राज्य करणारे शासक हे अशा कोणत्या ना कोणत्या ग्रंथांचा आधार घेऊन शासन करत.काहींनी बायबल चां आधार घेतला तर काहींनी कुराणाचा!