रमा नाडगौडा

रमा नाडगौडा

मनुष्यजन्माला येऊन तुम्ही जिवंत राहु शकता , जगु शकता, चांगलं राहु शकता किंवा आयुष्य समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असु शकता. शेवटचा पर्याय निवडला की समानधर्मी जीव ते साध्य करायला आपोआप जोडले जातात.  वाचन वेडापायी एकमेकिंना सापडत गेलेल्या मैत्रिणींचे विशारदा मंडळ. पुस्तकांवर चर्चा है उद्देश्य. त्यातुन जीला जे सापडेल ते सापडावे. शक्य असेल तेंव्हा लेखक ,लेखिका, कवी, कवयित्री ,अनुवादिका  अश्याना बोलावुन थेट त्यांच्याकडुन त्यांचे लेखन समजुन घेण्याचाही प्रयत्न.  फेसबुकवरुन भेटलेल्यांमधुन मीरा सिरसमकर हिचा दृक्श्राव्य कार्यक्रम, संजय भास्कर जोशी  असे मान्यवर लाभले. काल Deepa Deshmukh आली . तिची ओळख करून देण्याचे श्रेय मंगेशला. पण  बिचारी ट्राफिक जॅम मधे अडकली. पण तरीही आली. तीचे लेखन, त्यासाठी उपसलेले प्रचंड कष्ट,  धावपळ, अनुभव,  अभ्यास, तिचं त्यातुन शिकत जाणं .. खुप छान बोलली. आवर्जुन प्रत्येकीची ओळख करून घेतली. एखादे काम करायचेच असे ठरवल्यावर त्यासाठी ती कसे  ऑर्गनाइज्ड कष्ट घेते हे खरोखर प्रेरणादायी आहे. मी प्रयत्न करेन दीपा. तीचे समग्र लेखन ते करण्यामागची त्यांची भुमिका आणि ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावे यासाठी ती व श्री. अच्युत गोडबोले यांनी किती बारकाईनी काम केले आहे हे ऐकुन थक्क व्हायला झाले. एक विचार असतो. त्यामागे काही भुमिका आणि उद्देश्य असतो . याला प्रचंड कष्टांची जोड दिली की किती काम उभे रहाते याची साक्ष त्यांची पुस्तकं देतात. त्यांच्या सर्व आगामी प्रकल्पांना विशारदातर्फे मनःपुर्वक शुभेच्छा. आभार मानायला तीने मनाई केली असल्याने तिची भेट घडवुन आणल्याबद्दल श्रीयुत मार्क झुकरबर्ग यांचे अनेक आभार .
विनीत,
रमा