शीतल आमटे

शीतल आमटे

कैनवास या पुस्तकाबद्दल किती लिहावे ते कमीच् आहे.  अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी पुस्तकासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.
जगप्रसिद्ध कलाकृती आपल्याला माहिती असतात पण कलाकारांबद्दल आपल्याला अत्यल्प माहिती असते. त्यांची चित्रे आणि शिल्पे यातून ते अजरामर होतात. पण या पुस्तकात नुसती त्यांची शिल्पे व् चित्रेच उलगडून सांगितलेली नाहीत तर ती कशी आणि कोणत्या परिस्थितीत जन्माला आली, चित्रकारांचे स्वभाव, पारिवारिक परिस्थिती आणि त्यांची प्रेमप्रकरणे या सर्वांचाही अंतर्भाव केला आहे. त्यामुळे या पुस्तकातील सर्वच प्रकरणांना परिपूर्णता लाभलेली आहे. 
वैयक्तिकरित्या सांगायचे झाले तर चित्रे बघायची एक दृष्टी या पुस्तकाने दिली. अत्यंत सहज पद्धतीने एकेक अतिशय कठीण चित्र लेखकांनी सोपे करून सांगितले आहे. त्यामुळे एक मोठे म्युझियम पाहिल्याचे समाधान मिळाले. एकेक कलाकृती घेऊन इंटरनेटवर त्या शोधून त्यातील सौंदर्य न्याहळण्यात खूप छान वेळ गेला. 
हे पुस्तक अनुभवायची गोष्ट आहे. खूप कमी वेळात जास्तीत जास्त कलानुभूती हवी असेल तर जरूर वाचावे. 
चित्रकलेवर माझे प्रचंड प्रेम. कामाच्या रगाड्यात पेंटिंग मागे पडले. आता नव्याने हातात ब्रश घेण्याची इच्छा होते आहे.
Deepa Deshmukh तुम्हाला खूप धन्यवाद!!
डॉ. शीतल आमटे