पुस्तकं.. कोणी त्यांना मित्र म्हणतं, कोणी गुरू… आपलं भावविश्व, आपलं व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारी ही पुस्तकं.. ज्याला वाचनाची आवड आहे, त्याला जीवनात कधीच एकटेपणा वाटत नाही… मात्र हीच पुस्तकं असतात एखाद्या अवजाराप्रमाणे, समाजाला आकार देण्यासाठी ज्यांचा मानवाकडून वेळोवेळी वापर होत गेला आहे.