Articles

रयतेचा राजा शिवबा!

रयतेचा राजा शिवबा!

रांझ्याची पाटलाची एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे. या वतनदार पाटलानं एका गरीब शेतकर्‍याच्या तरुण मुलीला भर दिवसा सगळ्या लोकांसमोर उचलून नेलं आणि तिची अब्रू लुटली. आता जगून काय उपयोग असा त्या निष्पाप मुलीनं विचार करून विहिरीत उडी मारून जीव दिला. त्या काळी असे प्रकार सर्रास चालायचे. त्यामुळे गावालाही अन्याय बघण्याची आणि सहन करण्याची सवय लागली होती. सगळ्या गावाला या मुलीच्या आत्महत्येनं खूप वाईट वाटलं, पण ते असाहाय होते. त्या वेळी तिथल्या राजाच्या कानावर ही गोष्ट गेली. त्यानं त्या पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्यात आणलं आणि त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा ठोठावली. त्या शिक्षेची लगेचच अंमलबजावणी झाली. पुढे वाचा

माझं एक स्वप्न आहे...मार्टिन ल्यूथर किंग 

माझं एक स्वप्न आहे...मार्टिन ल्यूथर किंग  (January 15, 1929 - April 4, 1968)

पंधरा वर्षांचा एक चुणचुणीत हुशार मुलगा आपल्या शाळेच्या वादविवाद स्पर्धेत निवडला गेला आणि दुसर्‍या शहरातल्या स्पर्धेत भाग घेऊन त्यानं ‘कृष्णवर्णीय आणि राज्यघटना’ या विषयावर बोलून प्रथम पारितोषिक पटकावलं. त्याला खूप आनंद झाला होता आणि अर्थातच त्याच्याबरोबर असलेल्या त्याच्या शिक्षकालाही! कधी एकदा आपण बसने घरी पोहोचतो आणि सगळ्यांना बक्षीस दाखवतो असं त्या मुलाला झालं होतं. तो आणि त्याचे शिक्षक परतीच्या बसमध्ये शिरले. काहीच वेळात बस भरली. बस सुरू होणार एवढ्यात दोन गौरवर्णीय प्रवासी आत शिरले. बसमध्ये एकही जागा बसण्यासाठी शिल्लक नव्हती. पुढे वाचा

गुरुवर्य पं. नाथराव नेरलकर

गुरुवर्य पं. नाथराव नेरलकर

काल अंजली मालकर या मैत्रिणीची पोस्ट वाचली आणि ..... खरं तर परवापासून काही जवळच्या व्‍यक्‍तींच्या मृत्यूने आधीच मनाला सुन्नता आली होती आणि या बातमीने मन हळवं झालं. मृत्यू प्रत्येकालाच एक ना एक दिवस घेऊन जाणार आहे, आपण मृत्यूकडे तटस्थ नजरेनं बघायला हवं, वृध्दापकाळात, आजारपणात, अनेक त्रासात मृत्यू हा त्या माणसाची एका परीनं सुटका करतो असं समजावं हे सगळं त्या त्या वेळी मनाला समजावलं तरी मृत्यूनं हल्ला केला की सगळी समजूत गळून पडते आणि पुन्हा हा माणूस भले तो या पृथ्वीतलावर कुठेही असो, तो आता चालता, बोलता, हसता, खेळता असा कधीच आपल्याला दिसणार नाही ही जाणीवच वेदनादायी असते/आहे. पुढे वाचा

दिग्गज अमॅझॉन डॉट कॉमचा जनक जेफ बेझॉस 

दिग्गज अमॅझॉन डॉट कॉमचा जनक जेफ बेझॉस 

जेफ बेझॉस नावाच्या मुलाची ही गोष्ट! आपल्या आजोबांचा प्रचंड प्रभाव असलेल्या या मुलाला आजोबांप्रमाणेच आपलं म्हणणं खरं करण्याची सवय होती. जेफ बेझॉसनं आपल्या आईला आपण पाळण्यासारख्या लहान पलंगावर झोपणार नसून आजपासून सगळ्यांप्रमाणेच मोठ्या पलंगावर झोपणार असल्याचं जाहीर केलं. तीन वर्षांचा एवढासा मुलगा, मोठ्या पलंगावरून पडेल अशी त्याच्या आईला धास्ती वाटत होती. तिनं बेझॉसला अनेक परीनं समजावून सांगितलं. आपली आई आपलं ऐकत नाही, ही गोष्ट लक्षात येताच बेझॉसनं चक्क एक स्व्रू ड्रायव्हर घेऊन छोट्या पाळणेवजा पलंगाचे सगळे स्क्रू काढून जोडलेले भाग वेगळे करून टाकले. पुढे वाचा

एका लेखिकेचं मनोगत ...पुरोगामी जनगर्जना -  दिवाळी 2017

पुरोगामी जनगर्जना

मध्यंतरी आसावरी या मैत्रिणीला घेऊन बाबा म्हणजेच अनिल अवचट यांच्याकडे गेले होते. बाबानं त्या वेळी आमचे अनेक फोटो काढले. त्याला आसावरीचं हसणं खूपच आवडलं. मला म्हणाला, ‘तूही अशी खळखळून दात दाखवत हस बघू.’  पण मला आसावरीसारखं मनमोकळं हसणं प्रयत्न करूनही जमलं नाही आणि मन एकाएकी भूतकाळात गेलं. लहानपणी मी आणि माझी बहीण रूपा आम्ही मोठमोठ्यानं हसत, खिदळत असू. एकदा माझ्या मोठ्या भावानं आमचा तो आवाज ऐकला आणि 'मुलीच्या जातीनं इतक्या मोठ्या आवाजात दात दाखवत हसू नये' असं सांगत गालातल्या गालात कसं हसायचं याचे कितीतरी वेळ चक्क धडे दिले. घरात मोठ्या भावाचा धाक आणि दरारा आम्हा सर्वच भावंडांवर होता. पुढे वाचा

सिनेमे सुलगते है अरमॉं...

सिनेमे सुलगते है अरमॉं...

'सिनेमे सुलगते है अरमॉं’ हे तलत महेमूदनं गायलेलं बैचेन करणारं गीत असो, वा ‘दूर हटो ऐ दुनियावालो’ हे प्रखर देशभक्तीपर गीत असो अनिलदांच्या संगीतस्पर्शानं त्यातलं माधुर्य वाढणारंच आहे. आज शंभर वर्ष होऊन गेली, पण तरीही भारतीय संगीताच्या इतिहासात अनिलदा म्हणजेच अनिल विश्‍वास या बंगाली संगीतकाराचं नाव ठळकपणे कोरलं गेलंय. १९३५ ते १९६५ या ३० वर्षांच्या कालावधीत अनिल विश्‍वास यांच्या दर्जेदार संगीतानं लाखो श्रोत्यांना तृप्त केलं. अनिल विश्‍वास नसते, तर मुकेश आणि तलत महेमूद यांचा हृदयाला भिडणारा आर्त स्वर आपल्यापर्यंत पोहोचलाच नसता. हिंदी चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणून अनिल विश्‍वास ओळखले जातात. पुढे वाचा