Articles

फ्रान्सिस्को- जोसे- द- गोया 

फ्रान्सिस्को- जोसे- द- गोया - युगांतर दिवाळी 2015

फ्रान्सिस्को जोसे द गोया हा स्पेनमधला एक महान प्रतिभावान चित्रकार म्हणून ओळखला जातो.  गोयाच्या चित्रांमधून स्पेनचा व्यक्तित्ववाद आणि त्या देशाचं हट्टी स्वच्छंद मन ठळकपणे दिसतं. गोयाच्या कुठल्याही चित्रात त्रयस्थ वृत्ती दिसत नाही. गोयाच्या प्रत्येक चित्रात गोयाही आपल्याला कळतनकळत दिसायला लागतो. स्पेनच्या राजदरबारात तो राजचित्रकार म्हणून मानाचं स्थान भूषवत असताना त्यानं राजघराण्यातल्या व्यक्तींची आणि चर्चची अनेक चित्रं रेखाटली होती. गोया हा स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा पुरस्कर्ता होता. वृत्तीनं तो निडर असल्यामुळे त्याला बेछूट आणि बेभान होऊनल जगायला आवडे. पुढे वाचा

थिंक पॉझिटिव्ह दिवाळी 2015

थिंक पॉझिटिव्ह - दिवाळी 2015

वर्तमानात जगायला आवडत असल्यामुळे कदाचित झालेल्या घटनांची खंत आणि भविष्याची चिंता मला फारशी वाटत नाही. पण हे वर्तमानात जगणं आणि आयुष्याकडे आशावादी नजरेनं पाहणं हे एकाच दिवसात घडलं नाही. त्यासाठी बर्‍यावाईट अनुभवांच्या, अडथळ्यांच्या आणि अडचणींच्या प्रवासातून जावं लागलं. प्रत्येक वळणावरच्या बर्‍यावाईट प्रसंगांनी खूप काही शिकवलं. प्रत्येक प्रसंगी मनात नकारात्मक विचार आले नाहीत असं नाही, पण त्याच वेळी सकारात्मक विचारही आले. तर कधी तो विचार घेऊन अनेक व्यक्ती समोर उभ्या राहिल्या. त्या विचारांनी, त्या व्यक्तींच्या आश्‍वासक वागण्यानं ही वळणं पार करत प्रवास करताना मजा आली, आजही येतेय. पुढे वाचा

सलाम जिद्दीला............वेध, परभणी

सलाम जिद्दीला............वेध, परभणी 2017

परभणी इथे संपन्न होणार्‍या तिसर्‍या वेध उपक्रमात सारंग गोसावी आणि अभिजीत थोरात या दोन सुपरहिरोंना घेऊन २६ नोव्हेंबरला सकाळी परभणी रेल्वेस्थानकावर पोहोचले. डॉ. आनंद नाडकर्णी यांचा ७६ वा वेध उपक्रम सकाळी साडेनऊ वाजता परभणीच्या कृषी विद्यापीठात सुरू झाला. 
या उपक्रमात संगणक शब्दकोषाचा जनक सुनिल खांडबहाले, स्लमडॉग सीए म्हणून प्रसिद्ध पावलेला अभिजीत थोरात, सामाजिक कार्यकर्ती आणि बंडखोर नायिका गुंजन गोळे, काश्मीरमध्ये जाऊन काम करणारा असीम फाऊंडेशनचा संस्थापक सारंग गोसावी आणि कार्व्हरला घराघरांत नेऊन पोहोचवणार्‍या लेखिका वीणा गवाणकर सामील झाले होते.  पुढे वाचा

मनामनातल्या विद्याताई 

मनामनातल्या विद्याताई 

विद्या बाळ! मिळून सार्‍याजणी या प्रथितयश मासिकाच्या संस्थापक-संपादक! नारी समता मंचाच्या संस्थापक, स्त्रियांनी व्यक्त व्हावं म्हणून 'बोलते व्हा' केंद्राच्या संस्थापक,  पुरुषांनाही बोलायचं आहे हे जाणवताच 'पुरुष संवाद केंद्र' सुरू करणार्‍या विद्याताई. सामाजिक कार्य करताना अन्यायाविरोधात कायम उभ्या राहणार्‍या विद्या ताई संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. खरं तर त्यांची ओळख इथं संपत नाही. त्या माझ्यासारख्या अनेकींच्या आणि अनेकांच्या मनामनात एक विद्या सोडून गेल्या आहेत. त्यांचं जगणं, त्यांचं वागणं, त्यांची कृती हे सगळं एक होतं. त्यामुळेच त्या प्रत्येकाला आपल्याशा वाटत होत्या.  पुढे वाचा