Articles

लॅरी पेज, सर्गी ब्रिन आणि गूगल सर्च इंजिन - वयम दिवाळी 2019

लॅरी पेज, सर्गी ब्रिन आणि गूगल सर्च इंजिन - वयम दिवाळी 2019

आपल्या मनात एखादी गोष्ट यावी आणि क्षणार्धात ती समोर येऊन हजर व्हावी....तसंच! आजच्या युगात माणसाला गूगल ही आधुनिक तंत्रज्ञानानं दिलेली अनमोल अशी भेट आहे. गूगल नसेल तर आज जगण्याची कल्पनाही करता येत नाही. कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसावं आणि कुठलीही इच्छा व्यक्त करावी की काही क्षणात इच्छापूर्ती होते म्हणतात, तसंच गूगलवरही काही सेकंदात घडतं. कुठल्याही अनोळखी शहरात गेल्यावर तिथे ठरलेल्या पत्त्यावर जाताना मोबाईलमध्ये गूगलमॅपला जाण्याचं ठिकाण सांगितलं की गूगल मॅप अगदी त्या माणसाच्या घराची बेल वाजवण्यापर्यंत आपल्याला न चूकता घेऊन जातो. पुढे वाचा

माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड  - इत्यादी दिवाळी 2013

माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड  - इत्यादी दिवाळी 2013

मासवण हे ठाणे जिल्ह्यातल्या पालघर तालुक्यातलं 2000 वस्तीचं चिमुकलं आदिवासी गावं, मासवणच्या आदिवासी भागात ‘आदिवासी सहज शिक्षण परिवार’ या संस्थेत (15 गावांमधल्या 78 पाड्यांसाठी) शिक्षण विभाग प्रमुख म्हणून मी काम करत होते. आदिवासींची भाषा, त्यांच्या वागणुकीतला प्रेमळपणा आणि तिथल्या निसर्गाने मला केव्हाच आपलंसं केलं होतं. कमी होती फक्त माझ्या शहरी मित्र-मैत्रिणींच्या संवादाची. कारण त्या भागात मोबाईलला नेटवर्क मिळत नसे. त्याच दरम्यान यशवंतराव चव्हान प्रतिष्ठान, मुंबईच्या, औरंगाबाद इथे संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात माझी अच्युत गोडबोले या व्यक्तीशी ओळख झाली. पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या अपंग हक्क विकास मंचाची घौडदौड-मिळून साऱ्याजणी दिवाळी 2013

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या अपंग हक्क विकास मंचाची घौडदौड

एखादी संस्था, एखादं सामाजिक कार्य उभं राहतं ते काही व्यक्तींच्या सक्रिय सहभागामुळे! हळूहळू त्या त्या संस्थेचं कार्य विस्तारत जातं, त्यात अनेक उपक्रम, अनेक कार्यकर्ते सामील होत जातात आणि हा सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्यांचा कारवाँ पुढे पुढे चालत राहतो. मुंबईची सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या संस्थेचं नावं महाराष्ट्राला परिचित आहेच. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई या सेवाभावी संस्थेतर्फे कृषी, सहकार, शिक्षण, महिला सक्षमीकरण, कायदेविषयक, पर्यावरण, युवा वर्गासोबत,  सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम चालू आहे. पुढे वाचा

दिवाळीत दाखल झालेले १२ जीनियस वैज्ञानिक -जनादेश दिवाळी 2015

दिवाळीत दाखल झालेले १२ जीनियस वैज्ञानिक -जनादेश दिवाळी 2015

खरं तर ‘जीनियस’ हा प्रकल्प अनेक दिवसांपासून नव्हे तर अनेक वर्षांपासून आमच्या मनात घोळत होता! विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, व्यवस्थापन, साहित्य, चित्र-शिल्पकला, संगीत आणि समाज/राज्यशास्त्र अशा सगळ्या क्षेत्रांत ज्यांनी आख्ख्या जगाला एक वेगळा विचार करायला भाग पाडलं असे ७२ युगप्रवर्तक ‘जीनियस’ या मालिकेतून टप्प्याटप्प्यानं वाचकांसमोर आणायचं आम्ही ठरवलं. जग बदलण्याचा ध्यास घेतलेल्या या शोधकांनी आपल्या जगण्याची दिशाच बदलवली. त्यांनी आडवळणाची काटेरी वाट निवडली आणि झपाटल्यासारखे ते आपल्या ध्येयासक्तीच्या दिशेनं प्रवास करत राहिले. पुढे वाचा

पुरुष उवाच दिवाळी 2015 

साल्वादोर दाली - पुरुष उवाच दिवाळी 2015 

विसाव्या शतकातला साल्वादोर दाली हा अत्यंत प्रभावशाली, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व असलेला विचित्र आणि विक्षिप्त असा स्पॅनिश कलावंत होऊन गेला. त्याची सररिअ‍ॅलिझम शैलीत काढलेली चित्रं खूपच प्रसिद्ध आहेत. दालीनं आपल्या आयुष्यात 1500 वर चित्रं रंगवली आणि शेकडो चित्रं रेखाटली. चित्रकारितेबरोबरच त्यानं शिल्पकला, फोटोग्राफी, प्रिंटमेकिंग, फॅशन, जाहिरातक्षेत्र, लिखाण, फिल्ममेकिंग या सगळ्याच क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवला. दालीचं काम सररिअ‍ॅलिस्टिक शैलीत जरी जास्त करून ओळखलं जात असलं तरी त्याची अनेक चित्रं ही अभिजात शैलीतली आणि रेनेसान्स काळाचा प्रभाव असलेली आहेत. पुढे वाचा