Articles

आ. ह. साळुंखे

कविमनाचे आ.ह. साळुंखे!

महाराष्ट्रातले अभ्यासू पुरोगामी विचारवंत म्हणून आ. ह. साळुंखे ओळखले जातात. त्यांच्या कविता, त्यांची स्वकथनं, त्यांचं ललित लिखाण, त्यांचं बालसाहित्य, त्यांचं समीक्षात्मक लेखन आणि त्यांचं वैचारिक लेखन आज संपूर्ण महाराष्ट्राला नवा विचार देत आहे. त्यांच्या जगण्यावर चार्वाक, बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रभाव आहे. धर्म असो वा धर्मचिकित्सा, िायांचे प्रश्न असोत वा गुलामगिरीविषयीचं भाष्य, मनुस्मृतीबद्दलची आपली भूमिका असो वा चार्वाक, बुद्ध, फुले, शाहू महाराज यांच्या विचारांची केलेली मांडणी आ. पुढे वाचा

नवी व्‍यवस्‍था नवे प्रयोग

नवी व्‍यवस्‍था नवे प्रयोग

शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकातला मोहंजोदडो आणि हडप्पाचा धडा हा कायम लक्षात राहणारा. कारण, पाचेक हजार वर्षांपूवीर् तिथे वसलेली शहरं, रस्ते, दुमजलं घरं हे अनुभवणं थरारक होतं. हा धडा शिकताना, एकदा तरी तिथे जावं असं वाटतंच. त्‍या संस्‍कृतीचे अवशेष्‍ आज फोटोतून बघायला मिळतात. त्‍या नगररचनेविषयी मला विलक्षण कुतूहल वाटतं आणि आजही मला त्‍यावेळच्‍या समाजजीवनात केलेला सार्वजनिक विचार खूपच भावतो. सांडपाण्याची व्‍यवस्‍था आणि सगळ्यात महत्‍वाचं म्‍हणजे नगररचना करत असताना सार्वजनिक स्‍वच्‍छता आणि आरोग्य यांचा किती विचार त्‍याकाळी केलेला दिसतो. पुढे वाचा