Articles

 ताणतणाव आणि मी

ताणतणाव आणि मी - टेंशन कायकू लेनेका - थिंक पॉझिटिव्ह दिवाळी 2019

स्वतःविषयीच बोलायचं झालं तर मी खूप सकारात्मक विचारांची व्यक्ती आहे. माझ्या मनात कितीही वाईट प्रसंग आला तरी आजपर्यंत कधी आत्महत्येचा विचार डोकावला नाही. याचं कारण जेव्हा मी शोधायला लागते, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी उभ्या राहतात. खरं तर आयुष्यात अनेकदा चढउताराचे, नैराश्याचे अनेक प्रसंग आले, मनावर उदासीचे ढगही काही काळ पसरले. पण त्यावर मात कशी करायची हे कळत-नकळत लहानपणापासून मनावर बिंबलं गेलं. कधी भेटलेल्या व्यक्तींमुळे, तर कधी परिस्थितीमुळे, कधी मिळालेल्या चांगल्या-वाईट अनुभवांमुळे, तर कधी वाचलेल्या पुस्तकांमुळे!  पुढे वाचा

माझे गुज निरंजन दिवाळी 2019

मला आठवतं, लहानपणी मी फारशी बोलायची नाही. माझ्या मनात जे काय चाललंय ते इतरांनी ओळखावं असं मला वाटायचं. तसं झालं नाही तर मला फार राग यायचा. त्या वेळी मी चार-पाच वर्षांची असेन. आई-वडील तिरुपतीला गेले होते आणि माझी रवानगी आजी-आजोबांकडे परभणीला केली होती. मला खेळायला एक फुलाफुलांची पत्र्याची पेटी होती. त्यात माझी बाहुली आणि अनेक वस्तू होत्या. ही पेटी नेहमीच माझ्या सोबत असायची. हाताच्या मुठीत एक संगमरवरी शुभ्र ग्रीक शिल्पं असावीत अशी जोडी होती. ती गुळगुळीत शिल्पं मला खूपच आवडायची. माझी मूठ त्यामुळे घट्ट झाकलेली असायची. ते शिल्प हरवू नये यासाठी मी त्यांना जिवापाड जपायची. पुढे वाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (14 April 1891 - 6 December 1956)

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा भीम आणि त्याचे दोन भाऊ अशी तिघं भावंडं बैलगाडीतून हसत, खिदळत आणि गप्पा मारत प्रवास करत होती. एकाएकी त्या गाडीचालकानं भीमला त्याचं नाव आणि जात विचारली. या मुलांची जात ऐकताक्षणी गाडीवानानं जणू काही अंगावर पाल पडल्यासारखा चेहरा केला आणि अर्ध्या रस्त्यात त्या लहान लहान मुलांना आपल्या गाडीतून उतरवलं. ही मुलं चालत चालत मुक्कामी पोहोचली. ही घटना, हा प्रसंग त्यांच्याबाबतीत पहिल्यांदा घडला नव्हता. एकदा खूप जोराचा मुसळधार पाऊस पडत होता. भीम स्वतःला पावसापासून वाचवत एका घराच्या आडोशाला थांबला. पुढे वाचा

पुन्हा एक सिद्धार्थ - संत गाडगेबाबा

पुन्हा एक सिद्धार्थ - संत गाडगेबाबा

प्रल्हाद केशव अत्रें गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज या दोघांना राष्ट्रसंत मानत. ‘सिंहाला पाहावं वनात, हत्तीला पाहावं रानात आणि गाडगेबाबांना पहावं कीर्तनात’ असं आचार्य अत्रे अभिमानानं म्हणत. ही गोष्ट फार वर्षांपूर्वीची आहे. त्या वेळी गाडगेबाबांची प्रकृती चांगली नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे कायदेमंत्री होते आणि ते काही कामानिमित्त मुंबईला आले होते. सायंकाळच्या रेल्वेनं ते परत दिल्लीला जाणार होते. बाबासाहेबांना गाडगेबाबांची प्रकृती ठीक नसल्याची बातमी कळताच त्यांनी आपली सगळी कामं बाजूला ठेवली आणि दोन घोंगड्या विकत घेऊन ते त्यांना भेटायला तातडीनं हॉस्पिटलमध्ये गेले. पुढे वाचा

अल्फ्रेड नोबेल

अल्फ्रेड नोबेल (21 October 1833 - 10 December 1896)

एकदा एका माणसानं सकाळी उठल्याबरोबर नेहमीच्या सवयीप्रमाणे वर्तमानपत्र वाचायला घेतलं. त्यात आपल्याच नावानं प्रसिद्ध झालेला मृत्यूलेख बघून तो अक्षरशः गडबडून गेला. नावातल्या साधर्म्यामुळे गफलत होऊन त्याच्या मृत्यूची बातमी चुकून प्रसिद्ध झाली होती. त्या लेखात लिहिलं होतं, ‘ इमारती, रस्ते, पूल सगळं काही क्षणात उद्धवस्त करणार्‍या विध्वंसक स्फोटकाचा जनक मरण पावला. जगभरातल्या अशांततेचा फायदा घेऊन आपल्या उत्पादनानं  गब्बर झालेला धनाढ्य...’ वगैरे वगैरे. आपण खरोखरंच मेल्यावर आपल्यामागे आपली हीच ओळख असणार आहे का? असा विचार तो करायला लागला. पुढे वाचा

वॉल्ट डिस्ने 

वॉल्ट डिस्ने 

एके दिवशी एका चर्चच्या धर्मोपदेशकानं एका गरीब तरुणाला व्यंगचित्र बनवण्याचं काम दिलं. आवडीचं काम मिळाल्यामुळे तो तरुण खुश झाला आणि आपण चर्चच्या परिसरातच बसून व्यंगचित्र काढून देतो असं त्यानं त्या धर्मोपदेशकाला सांगितलं. धर्मोपदेशकानं त्याला तिथे बसायची परवानगी दिली. तरुण तिथेच मांडी ठोकून बसला आणि नेमकं कुठलं चित्र काढावं याचा विचार करायला लागला. काहीच क्षणात त्याच्या आजुबाजूच्या जागेतून काहीतरी विचित्र आवाज ऐकायला आले. आपलं काम थांबवून त्या तरुणानं बघितलं तर, अनेक उंदीर त्या ठिकाणी उड्या मारत इकडून तिकडे पळताना त्याला दिसले. ते उंदीर आपल्यातच मग्न होते. पुढे वाचा

एरिक फ्रॉम 

एरिक फ्रॉम 

आईविना वाढलेल्या एका मुलीचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम होतं. पुढे काही कारणांनी तिचं स्वतःचं  लग्न मोडलं आणि लग्न मोडल्यानंतर ती आणि तिचे वडील दोघंच एकमेकांच्या सोबतीनं राहायला लागले. खरं तर तिचे वृद्ध वडील खूपच कंटाळवाण्या, रुक्ष स्वभावाचे होते. पण तरीही तिची ते सोबत होते. एके दिवशी तेही मृत्यू पावले आणि त्या मुलींनं वडिलांपाठोपाठ आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं.  दुसर्‍या एका प्रसंगात पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मन सैनिक म्हणजे उच्च दर्जाचे आणि इंग्लिश सैनिक म्हणजे कमी दर्जाचे असं जर्मन सैनिक अभिमानाने सगळ्यांसमोर मोठ्या गुर्मीत म्हणत. पुढे वाचा