Movie Reviews

कुम्बलंगी नाईट्स

कुम्बलंगी नाईट्स

डोळ्यांना तृप्त करणारा केरळचा वेगवेगळ्या छटांचा हिरवाकंच निसर्ग, रात्रीच्या वेळी हिर्‍यांसारखं चमचमणारं पाणी, मासे पकडण्याचं रेशमी भासणारं जाळं,  गावातलं साधंसुधं शांत जगणं आणि त्यात घडत जाणारी एक गोष्ट....कुम्बलंगी नावाच्या केरळमधल्या एका गावात आई-वडिलांशिवाय राहणारी साजी, बोनी, बॉबी आणि फ्रँकी नावाची चार भावंडं...वडिलांचा मृत्यू झालेला आणि आई मुलांना सोडून कधीचीच नन झालेली...या मुलांचं घर एका बेटावर असलेल्या कचराकुंडीतल्या  कचऱ्यासारखं...घराला ना प्लास्टर, ना एक वस्तू जागेवर...गावातले लोक या घराला आणि आसपास जमणारा कचरा आणि तिथे वावर असणार्‍या कुत्र्यांना बघून हसत असतात, या चारही मुलांना त पुढे वाचा

जोजी

जोजी

नुकताच म्हणजे ताजा ताजा ७ एप्रिल २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला दिलीश पोथन दिग्दर्शित मल्याळम चित्रपट ‘जोजी’ बघितला. कारण तुम्हाला ठाऊकच आहे, माझा आणि तुमचा आवडता फहाद फासिल ची भूमिका यात आहे. पॅनडॅमिकच्या काळात चित्रीत केलेला हा चित्रपट आहे हे विशेष. चित्रपटात अर्थातच केरळचा नयनरम्य निसर्ग आहे. रबराच्या बागा असलेलं एक सधन कुटुंब, तगडा, धिपाड्ड पण वृद्घ झालेला कुट्टीपन पिके नावाचा पिता आणि त्याची जयसन, जोमन आणि जोजी नावाची तीन मुलं... जयसनचा घटस्फोट झालेला आणि त्याचा कुमारवयीन मुलगा पपी त्याच्याबरोबरच त्याच मोठ्या बंगल्यात राहत असतो. जयसनला दारूचं व्‍यसन असतं. पुढे वाचा

ॲस्पिरन्टस्

ॲस्पिरन्टस्

स्पर्धा परीक्षा आणि स्पर्धा परिक्षार्थी यांच्यावर आधारित ॲस्पिरन्टस् ही मालिका 7 एप्रिल 2021 पासून यू ट्यूब वर सुरू झाली असून आत्तापर्यंत या मालिकेचे 3 भाग प्रदर्शित झाले आहेत. टीव्‍हीएफ (द व्हायरल फीवर) चॅनेलने ॲस्पिरन्टस्ची निर्मिती केली असून या आधी त्यांनी कोटा फॅक्टरीसारखी मालिका प्रदर्शित करून शिक्षणक्षेत्रातल्या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं. ॲस्पिरन्टस् म्हणजे महत्वाकांक्षी - स्पर्धा परीक्षेचे तयारी करणारे लाखो तरुण आपण यूपीएसी परीक्षेत यश मिळवून आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न बघतात. त्यासाठी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये प्रवेश घेऊन जीवतोड अभ्यास करतात. पुढे वाचा

शोनार पहार याने के सोन्याचा पर्वत

शोनार पहार याने के सोन्याचा पर्वत

७२ वर्षांची उपमा नावाची एक निवृत्त शिक्षिका कलकत्यातल्या एका जुन्या घरात राहत असते. वृध्दावस्थेमुळे प्रकृतीची कुरबुरी सुरू असतात. तिची देखभाल करण्यासाठी काम करणारी मध्यमवयीन नोमिता नावाची एक स्त्री असते. रटाळ असं आयुष्य सुरू असतं. उपमाकडे बघून, तिच्या चेहऱ्यावरच्या चिंता पाहून हिचं पुढलं आयुष्य देखील कमी होईल असं वाटत असतं. उपमाचा एकुलता एक मुलगा सौम्या आपल्या बायकोबरोबर वेगळा राहत असतो. अर्थात तिच्या देखभालीसाठी जो काही खर्च लागेल तो करत असतो. सुरुवातीला दर आठवड्याला येऊन भेटून जाणारा सौम्या सहा महिन्याचं अंतर पडलं तरी भेटलेला नसतो आणि उपमालाही त्याच्या भेटण्याची गरज वाटेनाशी होते. पुढे वाचा