Movie Reviews

आरपार

आरपार

आरपार
ललित प्रभाकर हा माझा अत्यंत आवडता अभिनेता असल्यामुळे त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘आरपार’ हा चित्रपट बघणं आवश्यकच होतं. तसं आजचे अनेक अभिनेते, त्यात चैतन्य सरदेशपांडे, पुष्कराज चिरपुटकर, सिद्धार्थ मेनन, गिरीश परदेसी, वैभव तत्ववादी मला आवडतात. ललितचे  यापूर्वी चि. व चिसौंका, झोंबिवली, स्माईल प्लीज, आनंदी गोपाळ, हम्पी, असे काही चित्रपट मी बघितले होते. पण हा चित्रपट काही वेगळाच आहे. एक सुखद अनुभव देणारा. आजच्या तरुणाईची गोष्ट सांगणारा आहे. प्रेमात कोण काय सल्ला देत यापेक्षा मन काय कौल देत हे सांगणारा...प्रेमाचा खरा अर्थ प्रेमाचा प्रवासच सांगू शकतो याचा अनुभव देणारा.  पुढे वाचा

डोन्ट लूक अप

डोन्ट लूक अप

अमेरिकेत घडणारं कथानक दाखवलं असलं, तरी ते आपल्याही देशाला लागू पडतय  असं वाटावं अशी ही गोष्ट म्हणजे डोन्ट लूक अप हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला चित्रपट!अमेरिकेतल्या मिशिगन स्टेट युनिव्‍हर्सिटी मध्ये खगोलशास्त्रात पीएचडी करणारी विद्यार्थिनी केट डिबियास्की (जेनिफर लॉरेन्स) दूरवरचं निरीक्षण करू शकेल अशा दुर्बिणीने अंतरिक्षाचा अभ्यास करत असताना तिला एक धूमकेतू दिसतो. हा धूमकेतू बराच मोठा असतो. जवळजवळ 10 किमी व्‍यासाचा धूमकेतू वेगाने पृथ्वीकडे येताना तिला दिसतो. धूमकेतू हा उल्केसारखा असणारा एक खगोलशास्त्रीय पदार्थ असून ते सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती फिरतात. पुढे वाचा

रॉकेट बॉईज

रॉकेट बॉईज

भारताला स्वातंत्र्य  मिळण्यापूर्वीचा काळ, स्वातंत्र्यासाठी झगडणारे भारतीय, भारतातली विज्ञानाच्या क्षेत्रातली परिस्थिती, रामानुजन, जगदीशचंद्र बोस, मेघनाद साहा, सी. व्‍ही. रामन, सत्येन बोस, शांतिस्वरूप भटनागर यासारखे जीनियस वैज्ञानिक. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आर्थिक आणि मानसिकरित्या उद्घवस्त झालेल्या भारतात रस्ते, रेल्वेमार्ग, शेती, शिक्षण, रोजगार, उद्योग, अशा अनेक गोष्टींवर काम करत असतानाच संशोधनावर/संशोधनकेंद्र स्थापन करण्यावर, खूप मोठा भर दिला आणि वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिलं. पुढे वाचा