सत्यकाम
......खूप लहानपणी केव्हातरी, कुठेतरी हा चित्रपट बघितला होता. फार काही कळण्याचं वय नव्हतं, पण तरीही तो खूप आवडला होता...... - सत्यकाम! हृषिकेश मुखर्जींनी दिग्दर्शित केलेला १९६९ साली प्रदर्शित झालेला अतिशय उत्कृष्ट कथानक असलेला हा चित्रपट! या चित्रपटातली धर्मेंद्रची भूमिका त्याच्या संपूर्ण कारकिर्दीतली अप्रतिम भूमिका! या चित्रपटात धर्मेंद्र, संजीवकुमार, शर्मिला टागोर, अशोक कुमार, डेव्हिड, असरानी, बेबी सारिका यांच्या भूमिका आहेत. नारायण सान्याल यांच्या ‘सत्यकाम’ नावाच्याच कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला होता. पुढे वाचा