Movie Reviews

हॅस अर्नेस्टो टॅग गव्हेरा - एक थरार !!!

हॅस अर्नेस्टो टॅग गव्हेरा - एक थरार !!!

एक वादळ, एक बेभान व्यक्तिमत्व, एक प्रेरणा, एक बंडखोरी....असं काही म्हटलं की समोर येतो मिलिटरीचा युनिफॉर्म चढवलेला, ओठात चिरूट शिलगवलेला, बेदरकार चेहर्‍याचा तो - हो तोच तो 'चे गव्हेरा'! लॅटिन अमेरिकेतल्या जवळपास सगळ्या राष्ट्रांमधल्या युवांचा हीरो असलेला 'चे गव्हेरा'! क्युबातल्या, ग्वाटेमालातल्या, निकराग्वातल्या, बोलेव्हियातल्या लाखो लोकांचा हा नेता - अल्पावधीत आख्ख्या जगाचा लाडका नेता बनला. त्यांचे शर्ट्स, त्यांचे टीशर्ट्स, त्यांचे कॉफी मग्ज, त्यांचे ग्लासेस, त्यांच्या खोल्यांच्या भिंतीवरची पोस्टर्स या सगळ्यांवर 'चे गव्हेरा'ची छबी झळकत असायची. हा 'चे' तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला. पुढे वाचा

ब्लॅक Mail

सिनेमा सिनेमा

या दोन दिवसांत पाच चित्रपट बघितले. त्यातले दोन मराठी होते. पहिला तेजस देओस्कर दिग्दर्शित ‘अजिंक्य’! यात संदीप कुलकर्णी आणि कादंबरी कदम यांच्या प्रमुख भूमिका होत्या. शासकीय नोकरीत असलेला आणि बास्केट बॉल या खेळाचा कोच असलेला संदीप कुलकर्णी सतत जिंकत असतो आणि त्यामुळे त्याला हार सहनच होत नसते. अहंकारानं त्याला चांगलाच स्पर्श केलेला असतो. त्याच्या बायकोला द्यायला, किंवा स्वतःकडे बघायलाही त्याला वेळ नसतो. दोघांमध्ये दुरावा वाढलेला असतो. सतत भांडणं होत असतात आणि अशातच त्याची टीम एक मॅच हारते. त्यानं आपल्या बायकोला शब्द दिलेला असतो, ही मॅच मी हारलो तर खेळ सोडून देईन. पुढे वाचा