सिनेमे सुलगते है अरमॉं...

सिनेमे सुलगते है अरमॉं...

'सिनेमे सुलगते है अरमॉं’ हे तलत महेमूदनं गायलेलं बैचेन करणारं गीत असो, वा ‘दूर हटो ऐ दुनियावालो’ हे प्रखर देशभक्तीपर गीत असो अनिलदांच्या संगीतस्पर्शानं त्यातलं माधुर्य वाढणारंच आहे. आज शंभर वर्ष होऊन गेली, पण तरीही भारतीय संगीताच्या इतिहासात अनिलदा म्हणजेच अनिल विश्‍वास या बंगाली संगीतकाराचं नाव ठळकपणे कोरलं गेलंय. १९३५ ते १९६५ या ३० वर्षांच्या कालावधीत अनिल विश्‍वास यांच्या दर्जेदार संगीतानं लाखो श्रोत्यांना तृप्त केलं. अनिल विश्‍वास नसते, तर मुकेश आणि तलत महेमूद यांचा हृदयाला भिडणारा आर्त स्वर आपल्यापर्यंत पोहोचलाच नसता. हिंदी चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणून अनिल विश्‍वास ओळखले जातात. पुढे वाचा

रवींद्रनाथ टागोर

शब्दांचे जादूगार रवींद्रनाथ टागोर

एक छोटीशी मुलगी घराच्या खिडकीत बसून बाहेर चाललेली मिरवणूक बघत असते. त्या नगरीचा राजकुमार लवकरच तिच्या दारावरून पुढे जाणार असतो. एकाही कामात तिचं लक्ष लागत नसतं. छानसं तयार होऊन, गळ्यात माळ, कानात डूल घालून तिला खिडकीतून राजकुमाराला बघायचं असतं. खरं तर राजकुमाराला ती चिटुकली मुलगी दिसणार देखील नसते तरीही तिला मात्र सगळं दृश्य बघायचं असतं. इतकंच नाही तर तिच्या गळ्यातली माळही तिला राजकुमाराला द्यायची असते. जेव्हा राजकुमाराचा रथ तिच्या दारावरून जातो, तेव्हा खिडकीतून आनंदानं ती माळ खाली फेकते. क्षणार्धात तिची माळ रथाखाली चिरडली जाते. त्या माळेचं काय झालं कोणालाही कळत नाही. मुलगी मात्र खुश होते. पुढे वाचा

  प्रेमचंद

शब्दांचे जादूगार प्रेमचंद

हिरा आणि मोती नावाचे दोन बैल असतात. त्यांची आपसांत खूप मैत्री असते. ते शूर आणि स्वाभिमानी असतात. तसंच त्यांचं आपल्या झुरी नावाच्या मालकावर खूप प्रेम असतं आणि त्यांचा मालक देखील त्यांची खूप काळजी घेत असतो.  एके दिवशी झुरीचा मेव्हणा गोई झुरीकडे येतो आणि आपल्या शेतात काम करण्यासाठी त्याचे दोन्ही बैल त्यानं द्यावेत अशी मागणी करतो. बायकोचा भाऊ असल्यामुळे झुरीला नाही म्हणता येत नाही. हिरा आणि मोती यांना तो गोईबरोबर पाठवतो. हिरा आणि मोती यांना आपल्या राहत्या घरातून गोईबरोबर  पाठवणं आवडलेलं नसतं. आपल्या मालकानं आपल्याला विकलं असावं असंही त्यांना वाटतं. पुढे वाचा