सलाम जिद्दीला............वेध, परभणी

सलाम जिद्दीला............वेध, परभणी 2017

परभणी इथे संपन्न होणार्‍या तिसर्‍या वेध उपक्रमात सारंग गोसावी आणि अभिजीत थोरात या दोन सुपरहिरोंना घेऊन २६ नोव्हेंबरला सकाळी परभणी रेल्वेस्थानकावर पोहोचले. डॉ. आनंद नाडकर्णी यांचा ७६ वा वेध उपक्रम सकाळी साडेनऊ वाजता परभणीच्या कृषी विद्यापीठात सुरू झाला. 
या उपक्रमात संगणक शब्दकोषाचा जनक सुनिल खांडबहाले, स्लमडॉग सीए म्हणून प्रसिद्ध पावलेला अभिजीत थोरात, सामाजिक कार्यकर्ती आणि बंडखोर नायिका गुंजन गोळे, काश्मीरमध्ये जाऊन काम करणारा असीम फाऊंडेशनचा संस्थापक सारंग गोसावी आणि कार्व्हरला घराघरांत नेऊन पोहोचवणार्‍या लेखिका वीणा गवाणकर सामील झाले होते.  पुढे वाचा

विंदांचं चेतनामधलं राष्ट्रीय स्मारक  आणि उदय प्रकाश

विंदांचं चेतनामधलं राष्ट्रीय स्मारक  आणि उदय प्रकाश

आनंद (करंदीकर) आणि सरिता (आवाड) यांचे मुंबईला जाण्याबद्दलचे फोन आले आणि २२ तारखेला सकाळी मुंबईला जायचं ठरलं. विंदा करंदीकर यांचं राष्ट्रीय स्मारक मुंबईच्या चेतना महाविद्यालयाच्या परिसरात उभारलं असून प्रत्येक वर्षी तिथं विंदाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. या वेळी राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक/कवी उदय प्रकाश यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. तसंच विंदांच्या आणि उदय प्रकाश यांच्या काही कवितांचं वाचन किशोर कदम आणि संदीप कुलकर्णी करणार होते. हा कार्यक्रम ऐकणं म्हणजे पर्वणीच असणार होती.  पुढे वाचा

मनामनातल्या विद्याताई 

मनामनातल्या विद्याताई 

विद्या बाळ! मिळून सार्‍याजणी या प्रथितयश मासिकाच्या संस्थापक-संपादक! नारी समता मंचाच्या संस्थापक, स्त्रियांनी व्यक्त व्हावं म्हणून 'बोलते व्हा' केंद्राच्या संस्थापक,  पुरुषांनाही बोलायचं आहे हे जाणवताच 'पुरुष संवाद केंद्र' सुरू करणार्‍या विद्याताई. सामाजिक कार्य करताना अन्यायाविरोधात कायम उभ्या राहणार्‍या विद्या ताई संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. खरं तर त्यांची ओळख इथं संपत नाही. त्या माझ्यासारख्या अनेकींच्या आणि अनेकांच्या मनामनात एक विद्या सोडून गेल्या आहेत. त्यांचं जगणं, त्यांचं वागणं, त्यांची कृती हे सगळं एक होतं. त्यामुळेच त्या प्रत्येकाला आपल्याशा वाटत होत्या.  पुढे वाचा