Bertrand Arthur William Russell)

बर्ट्रांड रसेल (Bertrand Arthur William Russell) (18 May 1872 - 2 February 1970) - छंद दिवाळी 2018

एका गावात जे लोक स्वतःची दाढी करत नाहीत, त्यांची दाढी त्या गावातला एकमेव असलेला न्हावी करतो. आता याच गोष्टीकडे त्या गावाचा नियम म्हणून बघितलं तर मग तो न्हावी स्वतःची दाढी करतो की नाही? समजा, न्हावी स्वतःची दाढी करत नाही असं गृहीत धरलं तर वरच्या नियमाप्रमाणे तो स्वतःची दाढी करतो असं सिद्ध होतं. किंवा याउलट तो स्वतःची दाढी करतो असं गृहीत धरलं तर तो न्हावी त्याची स्वतःची दाढी करत नाही असं सिद्ध होतं. थोडक्यात आपण कुठल्याही गृहितकापासून सुरुवात केली तरी निष्कर्ष हे त्याच्या विरुद्धच जातात. या पॅरॉडॉक्स सोडवणं म्हणजे डोक्याला मस्त ताण देणारी गोष्ट आहे. पुढे वाचा

माझं मांजर प्रेम!

माझं मांजर प्रेम!

मला मांजर आवडण्यामागचं कारण म्हणजे आमच्या घरी ते आम्ही लहान असल्यापासूनच पाळलं गेल्यामुळे कदाचित असावं. मी लहान असताना आमच्या घरी म्हैस, कोंबड्या, कुत्रा, पोपट आणि मांजर ही मंडळी आमच्याबरोबरच गुण्यागोविंदाने नांदत होती. आई मराठवाड्यातल्या औंढा नागनाथ या छोट्याशा गावातली असल्यानं तिला शेती आणि प्राणी यांची मनापासून आवड होती. तिच्या आवडीमुळेच हे सगळे प्राणी-पक्षी आमच्या घराचा हिस्सा झाले होते. आई म्हशीचं दूध स्वतः काढायची. तिच्या घरी शेत असल्यामुळे तिला बागकामाचीही खूप आवड होती. वडील सरकारी अधिकारी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सरकारी निवासस्थानाला लागून बरीच जागा असायची. पुढे वाचा

लॅरी पेज, सर्गी ब्रिन आणि गूगल सर्च इंजिन - वयम दिवाळी 2019

लॅरी पेज, सर्गी ब्रिन आणि गूगल सर्च इंजिन - वयम दिवाळी 2019

आपल्या मनात एखादी गोष्ट यावी आणि क्षणार्धात ती समोर येऊन हजर व्हावी....तसंच! आजच्या युगात माणसाला गूगल ही आधुनिक तंत्रज्ञानानं दिलेली अनमोल अशी भेट आहे. गूगल नसेल तर आज जगण्याची कल्पनाही करता येत नाही. कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसावं आणि कुठलीही इच्छा व्यक्त करावी की काही क्षणात इच्छापूर्ती होते म्हणतात, तसंच गूगलवरही काही सेकंदात घडतं. कुठल्याही अनोळखी शहरात गेल्यावर तिथे ठरलेल्या पत्त्यावर जाताना मोबाईलमध्ये गूगलमॅपला जाण्याचं ठिकाण सांगितलं की गूगल मॅप अगदी त्या माणसाच्या घराची बेल वाजवण्यापर्यंत आपल्याला न चूकता घेऊन जातो. पुढे वाचा