राजेंद्र मंत्री

राजेंद्र मंत्री

'अनिल अवचट' या शीर्षकाचे दीपा देशमुख यांनी लिहीलेले पुस्तक मी नुकतेच वाचले. 'मृदू मनाचा मनस्वी कलावंत' असे उपशीर्षकही या पुस्तकास आहे. 
'तुमचे आमचे सुपरहिरो ' या मालिकेतील मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे अवघ्या ऐंशी पृष्ठांचे हे पुस्तक अवचट यांच्या व्यक्तीमत्वाच्या  अनेक पैलुंची ओळख ओघवत्या शैलीत करुन देते. मुलांनी, व मोठ्यांनीही वाचावे असे पुस्तक...!! 
(किंमत रु. नव्वद मात्र)
यातील सुनंदा अवचट यांच्यावर अनिल अवचट यांनी कविता मला आवडली. (पृष्ठ 30). सुनंदा अनिलची बायको असण्यापेक्षा मैत्रिण जास्त होती, असे दीपा देशमुख म्हणतात. ही कविता खाली देत आहे.
मैत्रिण कशी असावी
तिला नसावी वयाची अट
दिसण्याची तर नाहीच
तिला कळावं आपल्या मनातलं
ती कुठेही असली तरी
तिला कळावेत आपल्या मनातले सल
तिच्या चार शब्दांनी पळून जावी अस्वस्थता
तिनं तिचं जीवन जगावं आणि आपण आपलं
तरी सीमा नसावी
माणसातल्या गुंतवणुकीला
तिचं असणं असावं
आश्वासक, आल्हाददायक
तस्सच असावं
ती नसली तरीही
........अनिल अवचट
— राजेंद्र मंत्री, 13 जुलै 2016