Book Reviews

बुद्धाचा र्‍हाट  - उत्तम कांबळे

बुद्धाचा र्‍हाट

बुद्धाचा र्‍हाट समोरच्या रॅकमधून ‘बुद्धाचा र्‍हाट’ या पुस्तकानं मला खुणावलं आणि बाकीची कामं बाजूला ठेवून मी हे पुस्तक वाचायला घेतलं. प्रथम ‘बुद्धाचा र्‍हाट’ या शीर्षकानं मनात कुतूहल निर्माण केलं. बुद्धाचा र्‍हाट यातला र्‍हाट म्हणजे काय, तर कदाचित रहाटगाडगं यातला रहाट शब्द असावा आणि त्याच शब्दाचा अपभ्रंश र्‍हाट, असं वाटून गेलं. पण तरीही बुद्धाचा र्‍हाट म्हणजे नेमकं काय या कुतूहलापोटी पुस्तक उघडलं आणि पूर्ण पुस्तक एका दमात वाचून काढलं. 'बुद्धाचा र्‍हाट’ ही कादंबरी आहे की दीर्घ कथा याबद्दल अनेकांची अनेक मतं असू शकतील. मात्र हे पुस्तक हातात घेतलं की लगेच वाचून होण्यासारखं आहे. पुढे वाचा